आता दुबईतही ताज महल

दुबईमध्ये ताज महलची प्रतिकृती ताज अरेबिया बनवण्यात येत आहे. ही प्रतिकृती ताजमहलपेक्षाही भव्य असेल, असा दावा ताज अरेबिया बनवणाऱ्यांनी केला आहे. लिंक ग्लोबल ग्रुप ताज अरेबिया बांधत असून ‘द वर्ल्ड इन अ सिटी’ या नव्या योजनेनुसार फॉल्कनसिटी ऑफ वंडर्सच्या रुपात ताज अरेबिया पहायला मिळणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 3, 2012, 05:02 PM IST

www.24taas.com, दुबई
दुबईमध्ये ताज महलची प्रतिकृती ताज अरेबिया बनवण्यात येत आहे. ही प्रतिकृती ताजमहलपेक्षाही भव्य असेल, असा दावा ताज अरेबिया बनवणाऱ्यांनी केला आहे. लिंक ग्लोबल ग्रुप ताज अरेबिया बांधत असून ‘द वर्ल्ड इन अ सिटी’ या नव्या योजनेनुसार फॉल्कनसिटी ऑफ वंडर्सच्या रुपात ताज अरेबिया पहायला मिळणार आहे.
‘द वर्ल्ड इन अ सिटी’ या नव्या योजनेत अनेक कमर्शिअल बिल्डिंग्स बांधण्यात येणार आहेत. तसंच जगातील भव्य आणि सुंदर वास्तूंच्या प्रतिकृती बनवण्यात येणार आहेत. या वास्तू बनवण्याची योजना अत्यंत महत्वाकांक्षी असून यामुळे दुबईमध्ये पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
जगातील सात आश्चर्येही आता दुबईत या निमित्ताने पाहायला मिळतील. जगातील आश्चर्यांच्या प्रतिकृतीही दुबईत बनवण्यात येत आहेत. यात इजिप्तचे पिरॅमिड, हँगिंग गार्डन, आयफेल टॉवर, चीनची भिंत, पिसाचा कलता मनोरा या वास्तूंचाही समावेश आहे. ताज महलची प्रतिकृती मूळ ताज पेक्षाही वरचढ असेल, असा बनवणाऱ्यांचा दावा आहे. द वर्ल्ड इन अ सिटी योजना २०१४च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असं लिंक ग्लोबल ग्रुपचे अध्यक्ष अरूण मेहरा म्हणाले