चीनचा प्रशांत महासागरात सूर

जगाचे लक्ष पुन्हा एकदा चीनने आपल्याकडे वळविले आहे. गेल्याच आठवड्यात अवकाशात झेप घेऊन चीनच्या अंतराळवीरांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवले. आता त्याच्या पुढे एक पाऊल टाकून ‘जियाओलोंग’ या पाणबुडीद्वारे प्रशांत महासागरात तब्बल ७००० मीटर खोलवर सूर मारून चीन नाव कमावले आहे.

Updated: Jun 25, 2012, 01:37 PM IST

www.24taas.com, बीजिंग

 

जगाचे लक्ष पुन्हा एकदा चीनने आपल्याकडे वळविले आहे. गेल्याच आठवड्यात अवकाशात झेप घेऊन चीनच्या अंतराळवीरांनी  देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकवले. आता त्याच्या पुढे एक पाऊल टाकून  ‘जियाओलोंग’ या पाणबुडीद्वारे प्रशांत महासागरात तब्बल ७००० मीटर खोलवर सूर मारून चीनने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे.

 
‘जियाओलोंग’ या दंतकथेत वर्णिलेल्या महासागरी ड्रॅगनचे नाव लाभलेल्या या पाणबुडीत ये काँग, लि कैशाउ आणि यांग बो हे तिघे सागरवीर आहेत. विशेष म्हणजे या तिघा सागरवीरांनी सागरतळातून अवकाशात झेपावलेल्या आपल्या देशाच्या तीन अंतराळवीरांना शुभेच्छा संदेश पाठविला!  या पाणबुडीने सागरतळाकडे चारवेळा सूर मारला आहे.

 

प्रशांत महासागर पट्टय़ात या पाणबुडीतील पाणबुडय़ांचा सराव सुरू आहे. पाणबुडीने तब्बल ७,०१५ मीटर खोल बुडी मारली. या विक्रमामुळे ३,५०० मीटरहून खोलवर बुडी मारू शकणाऱ्या अमेरिका, फ्रान्स, रशिया आणि जपान या देशांच्या पाणबुडय़ांच्या रांगेत चीन डौलाने सहभागी झाला आहे. या पाणबुडीमुळे चीनला जगातील ७० टक्के सागरतळांचा शास्त्रीय अभ्यास करता येणार आहे.