पाकिस्ताननंतर चीनची घुसखोरी !

पाकिस्तानने कारगिलमध्ये ज्या पद्धतीने घुसखोरी केली होती, तशाच प्रकारची घुसखोरी चीनही करू शकतो, असा इशारा 'इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ऍनॅलिसिस' (आयडीएसए) या संस्थेने दिला आहे.

Updated: Nov 5, 2011, 01:23 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 

पाकिस्तानने कारगिलमध्ये ज्या पद्धतीने घुसखोरी केली होती, तशाच प्रकारची घुसखोरी चीनही करू शकतो, असा इशारा 'इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड ऍनॅलिसिस' (आयडीएसए) या संस्थेने दिला आहे.

भारताला धडा शिकविण्यासाठी चीन असे करण्याची शक्‍यता 'आयडीएसए'ने आपल्या अहवालात वर्तविली आहे. 'आयडीएसए'ने'अ कन्सिडरेशन ऑफ सायनो इंडियन कॉन्फ्लिक्‍ट' या शीर्षकाखाली अहवाल तयार केला आहे.

चीन आपले लष्करी सामर्थ वाढवत आहे आणि याची जाणीव करून देण्यासाठी चीन घुसखोरीसारखे पाऊल उचलू शकतो, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगसारख्या उंचावरील ठिकाणी ही घुसखोरी होऊ शकते. भारतही अशा प्रकारच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकेल, अशा परिस्थितींविषयीची चर्चा अहवालात करण्यात आली आहे. भारतावर श्रेष्ठत्व सिद्ध करणे हे एक प्रमुख कारण चीनच्या कारवायांसाठी देण्यात आले आहे.