फ्रेंच फ्राई खाल्यामुळे महिलेला केली अटक

एका महिलेला फ्रेंच फ्राई खाल्यामुळे जेलची हवा खावी लागली. वॉशिंगटन डीसीमध्ये एका महिलेने फ्रेंच फ्राईसाठी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद केला.

Updated: Sep 13, 2016, 09:19 PM IST
फ्रेंच फ्राई खाल्यामुळे महिलेला केली अटक title=

वॉशिंग्टन : एका महिलेला फ्रेंच फ्राई खाल्यामुळे जेलची हवा खावी लागली. वॉशिंगटन डीसीमध्ये एका महिलेने फ्रेंच फ्राईसाठी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत वाद केला.

एका हॉटेलमध्ये पोलीस अधिकारी जेवण्यासाठी गेला होता. त्याने तेथे मग फ्रेंच फ्राई आर्डर केलं. तेव्हा 2 महिला त्याच्या बाजुला येऊन बसल्या आणि त्यांच्यासोबत बोली लागल्या. बोलता बोलता एका महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या प्लेटमधून फ्रेंच फ्राई खाणे सुरु केलं. ऑफिसरने महिलेला असं करण्यास मनाई केली आणि म्हटलं की जर तुम्ही माझ्या प्लेटमध्ये परत हात टाकला तर तुम्हाला मी अटक करेल.

पोलीस अधिकाऱ्याने बजावल्यानंतर ही त्या महिलेवर त्यांच्या प्लेटमधून फ्रेंच फ्राईचा एक तुकडा उचलला. या घटनेनंतर त्या पोलिसाने त्या महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक केली.