या घराची किंमत आहे तीन कोटीहूनही अधिक

तुम्ही आतापर्यंत अनेक सुंदर घरे पाहिली असतील आणि अशा घरांच्या किंमतीचा अंदाजही तुम्हाला असेल. मात्र फोटोत दिसत असलेल्या घराची किंमत पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. 

Updated: Feb 3, 2016, 11:37 AM IST
या घराची किंमत आहे तीन कोटीहूनही अधिक title=
सौजन्य - डेली मेल

लॉस एंजेलिस : तुम्ही आतापर्यंत अनेक सुंदर घरे पाहिली असतील आणि अशा घरांच्या किंमतीचा अंदाजही तुम्हाला असेल. मात्र फोटोत दिसत असलेल्या घराची किंमत पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. 

हे घर लास एंजेलिसच्या नॉर्थब्रिज येथे असून 1,276 स्क्वेअर फूट इतके मोठे आहे. इतक्या खराब स्थितीत असूनही या घराची किंमत आहे तब्बल 3,22,93,088 रुपये. या घराची इतकी प्रचंड किमत असण्याचे कारण आहे तेथील परिसर. हा परिसर येथील फिल्म इंडस्ट्री आणि स्पोर्ट्स प्लेयर्सचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच या घराची किंमत इतकी अधिक आहे. 

१९६५ मध्ये हे घर बनवण्यात आले होते. ऑनलाइन वेबसाइटवर लिस्ट केल्यानंतर १० दिवसांच्या आत आतापर्यंत १२३, ४७६ लोकांनी हे घर पाहिलेय. इतकी मोठी किंमत दिल्यानंतरही तुम्हाला घर नीट कऱण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. तसेच हे घर खरेदी करायचे असल्यास केवळ रोख रक्कम स्वीकारले जाणार असल्याचीही अट ठेवण्यात आलीये.