समुद्रातून मिळाला दोन कोटींचा खजिना

तब्बल दोन कोटींचे सोने समुद्रात सापडल्याने एका सामान्य कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही बातमी समोर येताच सर्व देशाला आश्चर्याचा धक्का बसलायं.

Updated: Sep 8, 2013, 08:01 PM IST

www.24taas.com झी मीडिया, अमेरीका
तब्बल दोन कोटींचे सोने समुद्रात सापडल्याने एका सामान्य कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ही बातमी समोर येताच सर्व देशाला आश्चर्याचा धक्का बसलायं.
एरिक श्मिट आणि त्याचे कुटुंब अनेक वर्षापासून अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहत आहे. अटलांटिक महासागरच्या काठावर राहणारे हे कुटूंब अनेक वर्षापासून आसपासच्या भागात काही वेगवेगळ्या प्रकारची यंत्र घेऊन खजीना शोधण्याचे काम करत होते. पण समुद्राच्या आतील भागातून त्यांच्या हाती काहीही लागत नव्हते. पण या आठवड्यात या कुटुंबाच्या हाती असे काही लागले की, ते कुटुंब करोडपतीच झाले.
श्टिम कुटुंब खजिन्याचा शोध घेत असतांना त्यांचे जहाज ११ ऐतिहासिक जहाजांच्या ढिगाऱ्याजवळ पोहोचलो आणि त्यांच्या यंत्रातून खजिना असल्याचा सिग्नल मिळाला. या ढिगाऱ्यातून त्यांना स्पेनमधील सोन्याची काही ऐतिहासिक नाणी आणि सोन्याची साखळी मिळाली. या खजिन्याची किंमत जवळजवळ ३ लाख डॉलर म्हणजे २ करोड रूपये एवढी असण्याची शक्यता आहे.
३०० वर्ष होऊन गेलेल्या या जहाजाच्या ढिगाऱ्यातून सोने कसे आले असेल?... असा प्रश्न सर्वानांच पडला. खूप वर्षापुर्वी म्हणजेच १७१५ साली स्पेनची ११ जहाजे या ठीकाणाहून जात होती तेव्हा अचानक आलेल्या समुद्री वादळामुळे ती ११ जहाजे पाण्यात बुडाली. यामध्ये ४०० मिलियन डॉलरचा खजानादेखील होता.
श्टिम या कुटुंबाने क्वनीन्स ज्वैल LLC नावाच्या कंपनीकडून परवानगी घेतली होती. तेव्हा या कंपनीने कायदेशीररित्या खजाना शोधणाऱ्या लोकांमध्ये जाण्याची परवानगी दिली आणि या कुटुंबाला असं काही मिळालं की त्याने संपूर्ण देशच चकीत झाला.
आता या खजिन्याची वाटणी करण्यात येणार आहे. अमेरिकेच्या नियमानुसार, काही खजिना फ्लोरिडा राज्यातील म्यूजियमला दिला जाणार आहे. तर उरलेल्या खजिन्याचे समान भाग करून श्टिम कुटुंब आणि कंपनीला दिला जाणार आहे.
श्टिम कुटुंबामध्ये आता एक नवीन आशा निर्माण झाली आहे. आता समुद्रात असलेल्या बाकीचा खजिना शोधण्यासाठी हे कुटुंब आता कसून प्रयत्न करणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.