ठाण्यातील वृद्धावर पाकमध्ये उपचार

By Surendra Gangan | Last Updated: Saturday, July 20, 2013 - 15:36

www.24taas.com, झी मीडिया,मुंबई
ठाण्यातले वसंत बोंडले यांच्यावर पाकिस्तानात यशस्वी उपचार करण्यात आले. ठाण्यातल्या वसंत विहार मध्ये राहणारे ७६ वर्षांचे वसंत बोंडले त्यांच्या पत्नीसह स्केंडोनेवियाला गेले होते.
स्केंडोनेवियाला येथून परतत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना ह्दयविकाराचा झटका आला. त्यावेळी त्यांना तात्काळ पाकिस्तानातल्या कराचीमध्ये उतरवण्यात आले.

बोंडले यांच्यावर पाकिस्तानच्या आगा खान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु झाले. महत्त्वाचं म्हणजे बोंडले यांच्याकडे व्हिसा नसतानाही पाकिस्तानच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी पाकिस्ताननं कुठलीही आडकाठी केली नाही. उलट त्यांना अत्यंत चांगली वागणूक मिळाली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, July 20, 2013 - 15:33
comments powered by Disqus