अमेरिकेतील भारतीयांना स्वदेशात परतण्याची ओढ...

Last Updated: Wednesday, April 19, 2017 - 22:20
अमेरिकेतील भारतीयांना स्वदेशात परतण्याची ओढ...

नवी दिल्ली : अमेरिकेत राहणारे अधिकतर भारतीय सध्या मायदेशात नोकरीच्या शोधात असल्याचं समोर येतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रं हाती घेतल्यानंतर ही संख्या वाढल्याचं लक्षात येतंय. 

भारतात नोकरी मिळवून पुन्हा स्वदेशी परतण्याचं स्वप्न अनेक सध्या अमेरिकेत राहणारे 'एनआरआय' पाहत आहेत. 

डिसेंबर ते मार्च दरम्यान अशा अर्जांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येतेय. कन्सल्टिंग फर्म 'डिलॉईट टॉच तोहमात्सू'नं दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2016 मध्ये अमेरिकेत नोकरी करणाऱ्या 600 लोकांनी भारतात नोकरीसाठी अर्ज केले होते. तर मार्चपर्यंत ही संख्या जवळपास 7000 अर्जांवर येऊन धडकली.

अमेरिकन नागरिकता आणि अप्रवासन कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, 2018 साठी एच-1बी व्हीजाच्या अर्जांमध्ये गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच घट झालीय. 

ट्रम्प प्रशासनानं अनेकदा स्थानिक लोकांना नोकरीत प्राथमिकता देण्याच्या घोषणांवर भर दिलाय. याचा परिणाम भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअर्सवर पडतोय. अमेरिकेत राहणं धोकादायक ठरत असल्याचंही अनेक घटनांमधून समोर येतंय.... अशामध्ये सध्या अमेरिकेत राहणारे अनेक भारतीय पुन्हा भारतात येण्यासाठी उत्सुक आहेत.  

First Published: Wednesday, April 19, 2017 - 22:20
comments powered by Disqus