तुर्किने पाडले सीरियाच्या सीमेवर रशियाचे लढाऊ विमान

तुर्किने सीरियाच्या सीमेवर लष्कराचे एक लढाऊ विमान पाडले. लष्कराच्या सूत्रांचा हवाला देऊन स्थानिक मीडियाने याचे वृत्त दिले आहे. दरम्यान, मॉस्कोने याला दुजोरा दिलाय. पाडण्यात आलेले विमान हे आमचे आहे.

Reuters | Updated: Nov 24, 2015, 04:43 PM IST
तुर्किने पाडले सीरियाच्या सीमेवर रशियाचे लढाऊ विमान  title=

अंकारा : तुर्किने सीरियाच्या सीमेवर लष्कराचे एक लढाऊ विमान पाडले. लष्कराच्या सूत्रांचा हवाला देऊन स्थानिक मीडियाने याचे वृत्त दिले आहे. दरम्यान, मॉस्कोने याला दुजोरा दिलाय. पाडण्यात आलेले विमान हे आमचे आहे.

सीएनएन तुर्कि आणि एनटीव्ही टेलिव्हीजनने दिलेल्या  वृत्तानुसार हवेत विमानाचा स्फोट झाला आणि विमानाला आग लागली. ही घटना सीरियाच्या सीमेनजीक घडली. हे विमान तुर्कमेन पवतावर पडल्याचे या वृत्तात म्हटलेय. दरम्यान, तुर्किच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले, पाडले गेलेले विमान कोणत्या देशाची आहे, याची माहिती घेत आहोत.
 
 रशियाने सांगितले, सीरियाच्या सीमेवर तुर्किने पाडलेले विमान हे लष्कराचे आहे. सुखोई एसयू-२४ जेट विमान आहे. मात्र, या विमानाने तुर्किच्या हद्दीत प्रवेश केलेला नव्हता. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटलेय, गोळीबारामुळे लष्कराचे लढाऊ विमान एसयू २४ हे सीरियात दुर्घटनाग्रस्त झाले आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, पायलटबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.