दोन मुंडक्यांचे बांग्लादेशी बाळ पाहून डॉक्टर हादरले

बांगलादेशातील एका हॉस्पिटलमध्ये दोन मुंडकी असलेले बाळ जन्माला आल्याचे वैद्यकीय अधिकारी आणि बाळाच्या वडिलांनी सांगितले. काल रात्री उशीरा बाळाचा जन्म झाला आहे. 

Updated: Nov 12, 2015, 09:14 PM IST
दोन मुंडक्यांचे बांग्लादेशी बाळ पाहून डॉक्टर हादरले  title=
AFP photo

ढाका : बांगलादेशातील एका हॉस्पिटलमध्ये दोन मुंडकी असलेले बाळ जन्माला आल्याचे वैद्यकीय अधिकारी आणि बाळाच्या वडिलांनी सांगितले. काल रात्री उशीरा बाळाचा जन्म झाला आहे. 

सध्या या बाळाला श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने त्याचावर उपचार सुरू आहे. त्याला आयसीयूत हलविण्यात आले आहे. 

मी जेव्हा हे बाळ पाहिले तेव्हा मला धक्का बसला. ही मुलगी असून तिला संपूर्ण विकसीत असे दोन मुंडके आहेत. ती दोन्ही तोंडांनी खाऊ शकते आणि दोन्ही नाकांनी श्वास घेऊ शकते. असे बाळाचे वडील जमाल मिया यांनी सांगितले. 

मी अल्लाचे धन्यवाद मानतो की ती आणि तिची आई सुरक्षित आहेत, असे मियाँ यांनी एएफपीशी बोलताना सांगितले. यासंदर्भात अबू कवसार या स्टँडर्स हॉस्पिटलच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार या मुलीला एकच धड असून दोन मुंडकी आहेत मुंडक्याखालील शरीर हे सामान्य बालकासारखे आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.