अमेरिकेतील सर्वात मोठ्या ऑनलाई मेल एस्कॉर्ड सर्व्हिसच्या सीईओसह कर्मचाऱ्यांना अटक

अमेरिकेतील पुरुषांसाठीची सर्वात मोठी ऑनलाईन एस्कॉर्ड सर्व्हिस रेंटबॉय डॉट कॉमच्या सीईओ जेफरी ह्युरॅंटसह सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनी वेश्यावृत्तीला प्रवृत्त करत अमेरिकेच्या ट्रव्हल कायदाचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

Reuters | Updated: Aug 26, 2015, 07:12 PM IST
अमेरिकेतील सर्वात मोठ्या ऑनलाई मेल एस्कॉर्ड सर्व्हिसच्या सीईओसह कर्मचाऱ्यांना अटक title=

न्यूयॉर्क : अमेरिकेतील पुरुषांसाठीची सर्वात मोठी ऑनलाईन एस्कॉर्ड सर्व्हिस रेंटबॉय डॉट कॉमच्या सीईओ जेफरी ह्युरॅंटसह सहा कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनी वेश्यावृत्तीला प्रवृत्त करत अमेरिकेच्या ट्रव्हल कायदाचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

२१०० शहरांत १०,५०० पुरुष
रेंटबॉय डॉट कॉमने आपल्या संकेतस्थळावर दावा केला आहे की, २१०० शहरांत १०५०० पुरुष एस्कॉर्ट आहेत. कंपनी १९९६पासून सुरु आहे. आम्ही कोणत्याही वेश्यावृत्तीला प्रवृत्त केलेले नाही.

५ वर्षांत १ कोटी डॉलर कमाई
वेबसाईटने आपल्या ग्राहकांकडून दर महिन्याला ६० डॉलर म्हणजेच ३९०० रुपये चार्ज  घेतला जातो. २०१० ते २०१५ दरम्यान एक कोटी डॉलरची कमाई केली आहे. अमेरिकन पोलिसांनी अटक केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात १४ लाख डॉलर आहेत. ही रक्कम जप्त करण्यासाठी पोलिसांनी वॉरंट जारी केले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.