पाक दहशतवादी बहावल खानवर अमेरिकेची बंदी

अफगानिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी झालेला पाकिस्तानी दहशतवादी नेता बहावल खान याच्यावर अमेरिकेने बंदी लादली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 7, 2013, 03:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया,वॉशिंग्टन
अफगानिस्तान आणि पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी झालेला पाकिस्तानी दहशतवादी नेता बहावल खान याच्यावर अमेरिकेने बंदी लादली आहे. त्याला काळ्या सूचित टाकण्यात आले आहे.
पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाईत बहावल खान याचा हात आहे. त्यामुळे अमेरिका परराष्ट्र विभाग आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद करारनुसार प्रतिबंध टाकण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. खान हा मुल्ला नाजिर ग्रुपचा नेता आहे. तो पाकिस्तानमध्ये वजिस्तान कबायली भागात वास्तव्य करीत आहे. त्याठिकाणी त्यांने अड्डा बनविला आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने याबाबत एक निवेदन जारी केले आहे. खान हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याला अमेरिकेच्या अधिकार क्षेत्रात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच त्याची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकन नागरिक त्याच्याही कोणत्याही प्रकारचे व्यवहार किंवा संबंध ठेवणार नाहीत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.