मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या : अमेरिका

अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्‍ट्राईकचं समर्थन करत त्याला आत्मरक्षणेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या दक्षिण आशिया प्रकरणाचे प्रभारी पीटर लावोयने युद्ध प्रभावित अफगानिस्तानच्या शांतीला काश्मीर मुद्द्याशी न जोडत पाकिस्तानची याचिका फेटाळली आहे. 

Updated: Oct 13, 2016, 03:55 PM IST
मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या : अमेरिका title=

वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्‍ट्राईकचं समर्थन करत त्याला आत्मरक्षणाचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या दक्षिण आशिया प्रकरणाचे प्रभारी पीटर लावोयने युद्ध प्रभावित अफगानिस्तानच्या शांतीला काश्मीर मुद्द्याशी न जोडत पाकिस्तानची याचिका फेटाळली आहे. 

व्हाईट हाऊसकडून प्रतिक्रिया देतांना त्यांनी भारताच्या सर्जिकल स्ट्राईकचं समर्थन केलं आहे. किरबीने म्हटलं की, जसं की मी आधीही म्हटलं होतं की, आम्ही मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा होतांना पाहू इच्छितो. पाकिस्तानकडून त्यांच्या धरतीवरुन होणाऱ्या भारतविरोधी दहशतवादी कारवायांविरोधात कडक पावलं उचलली जावीत. हाफिज सईदच्या वक्तव्यावर त्यांनी म्हटलं की, मी एका घोषित दहशतवाद्याबद्दल असं काहीही नाही बोलू इच्छित ज्यामुळे त्याची चर्चा व्हावी.

हाफिज सईदने एका व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकेला लक्ष्य केलं होतं. काश्मीर आणि इस्लामसाठी आम्ही लढत राहू. अमेरिका आणि भारत जेव्हा आम्हाला त्रास देतात तेव्हा आम्हाला आवडतं. काश्मीरच्या स्वतंत्रतेसाठी आम्ही लढाऊ व्यक्ती तयार करत राहू. अमेरिकेने मला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केलं आहे तरी मी येथे आरामात राहत आहे असं देखील त्याने म्हटलं आहे.