कॉलेजच्या फीसाठी अखेर ती पॉर्न स्टार झाली

आपल्या कुटुंबासाठी तो बाहेर देशात काम करत होता. अफगाणिस्तानसारख्या देशातील दुर्गम भागात त्याने नोकरी स्वीकारली होती.

Updated: Mar 12, 2014, 03:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
आपल्या कुटुंबासाठी तो बाहेर देशात काम करत होता. अफगाणिस्तानसारख्या देशातील दुर्गम भागात त्याने नोकरी स्वीकारली होती.
मात्र तो जेव्हा घरी आला तेव्हा त्याला कळलं की, आपली मुलगी पॉर्न स्टार झाली आहे. तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसला.
मरियम ही आता एक प्रसिद्ध पॉर्न स्टार झाली आहे. कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने मरियमने हा मार्ग स्वीकारला असल्याचं तिने सांगितलं आहे. तिला इंडस्ट्रीत बेली नॉक्स नावाने ओळखतात.
मरियमचे वडिल हे आर्मीत डॉक्टर आहेत, आपली मुलगीही डॉक्टर व्हावी म्हणून, त्याने तिचे अॅडमिशन न्यूयॉर्कच्या एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये केलं.
कारण मरियम ही तशी हुशार होती. तिचा नेहमी ए ग्रेडने मार्क्स मिळवत होती.
मरियम पॉर्न स्टार झाल्याने घरची मंडळी हैराण झाली आहे. यावर मरियम म्हणते, मला दोष देत असले, तरी यामागे मोठं आर्थिक कारण होतं.
मला फीसाठी लागणारे पैसे पूर्ण होत नव्हते, मी ट्यूशन घेत होती त्यात अवघे पाच लाख रूपये मिळत होते.
मरियम एके दिवशी एका शोमध्ये गेली होती. तिला पॉर्न स्टारची ऑफर देण्यात आली, ही ऑफर मरियमने स्वीकारली.
कारण त्या बदल्यात देण्यात येणार पॅकेज तिला मान्य होतं, यातून मरियमची पैशांची चणचण दूर होणार होती.
आपल्या १८ वर्षाच्या मुलीने असं का केलं?, हा प्रश्न सतत मरियमच्या पालकांना सतावत होता.
मात्र आता आपल्याला मरियमच्या पाठिशी उभं रहायचं असल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. यामुळे मरियमला आता यात काहीही वावगं वाटत नाहीय.
आपल्याला आता हे काम बरं वाटत असल्याचं मरियमने म्हटलं आहे. आपण पॉर्नस्टार का झालो, यावर मरिमने अनेक टीव्ही चॅनेल्सवर मुलाखतीतून सांगितलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close