हल्ल्याची शक्यता, पाकमधून अमेरिकन दुतावास माघारी

By Surendra Gangan | Last Updated: Friday, August 9, 2013 - 11:09

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
अमेरिकेन व्हाईट हाऊस हल्यानंतर अतिरेकी हल्ल्याची मनात जास्तच भीती घेतल्याचे दिसून येत आहे. अतिरेक्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानमधील अमेरिकन दुतावासातील सर्व अधिकाऱ्यांना मायदेशी बोलावले आहे.
लाहोर येथे अमेरिकन दुतावास आहे. याठिकाणी आवश्यक कामापेक्षा अधिक कर्मचाऱ्या आहेत, त्यांना तात्काळ अमेरिकेत परतण्याचे आदेश दिले आहे. तसेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय विभागाच्यावतीने नागरिकांना पाकिस्तान दौरा करू नये, असे आवाहन केले आहे. संभाव्य अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.
काही परदेशी आणि पाकिस्तानमधील काही अतिरेकी गटाकडून आत्मघातकी हल्ला होऊ शकतो. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका आहे. येमेन देशातील अमेरिकी दुतावास बंद करण्यात आलाय. तेथील कर्मचाऱी बोलविण्यात आले आहेत. तर अमेरिकेने १७ दुतावास कार्यालये बंद केली आहेत. त्यानंतर पाकिस्तानमधील दुतावासातील कर्मचाऱी माघारी बोलविण्याचा निर्णय घेतला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 9, 2013 - 11:09
comments powered by Disqus