'सर्जिकल स्ट्राईक' भारताचा सुरक्षा अधिकार - अमेरिका

भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आता अमेरिकेनंही पाठिंबा दर्शवलाय. काश्मीर मुद्यासंबंधी अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय. 

Updated: Oct 13, 2016, 03:31 PM IST
'सर्जिकल स्ट्राईक' भारताचा सुरक्षा अधिकार - अमेरिका title=

वॉशिंग्टन : भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आता अमेरिकेनंही पाठिंबा दर्शवलाय. काश्मीर मुद्यासंबंधी अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय. 

काश्मीर मुद्यासंबंधी बोलताना पाकिस्तान प्रतिनिधिनं, अफगाणिस्तानच्या शांतीचा रस्ता काश्मीरहून जातो... असं म्हटलं होतं. अमेरिकेनं पाकचा हा दावा साफ फेटाळून लावलाय. 

उरी दहशतवादी हल्ला सीमेवर सुरु असलेल्या दहशतवादाचं स्पष्ट उदाहरण आहे. यानंतर भारतानं जी कारवाई केली ती भारताच्या आत्मरक्षेचाच एक भाग आहे. भारताला आपल्या सुरक्षेचा संपूर्ण अधिकार आहे, असं व्हाईट हाऊसकडून साऊथ एशियन प्रकरणांचे अधिकारी पीटर लावोय यांनी म्हटलंय.

पाकनं सीमेवर तैनात केलेल्या मोठ्या सेना संख्येवरही लेवॉय यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दोन्ही देशांनी तीन वेळा युद्धाचा अनुभव घेतलेला आहे... आणि एलओसीवर दोन्ही देशांनी सेना तैनात करून ठेवलीय, याचाही त्यांनी उल्लेख केला. 

भारत यावर्षाच्या शेवटपर्यंत अणू पुरवठादार गटाचा (NSG)सदस्य बनेल यासाठी अमेरिका पूर्ण प्रयत्न करत असल्याचंही एनएसजी सदस्य असलेल्या पीटर यांनी म्हटलंय.