अरजेंटिनाच्या राष्ट्रपती ख्रिस्तिना यांचा डान्स

अरजेंटिनाच्या राष्ट्रपती ख्रिस्तिना फर्नांडिस यांनी एका राजकीय रॅलीत, एका गाण्यावर ठेका धरला.

Updated: Oct 13, 2015, 01:23 PM IST

बेनोस-आयरिज : अरजेंटिनाच्या राष्ट्रपती ख्रिस्तिना फर्नांडिस यांनी एका राजकीय रॅलीत, एका गाण्यावर ठेका धरला, ख्रिस्तिनाबाईंनी एवढा ठेका धरला की जणू काही त्या शांताबाई गाण्यावर नाचत होत्या की काय?, असा प्रश्न पडेल, हा व्हिडीओनंतर व्हायरल झाला. 

जगभरात राष्ट्रपती ख्रिस्तिनाबाईंचा डान्स पाहिला जातोय. हे गाणं राजकीय थीमवर बनवण्यात आलं आहे, त्यावर ख्रिस्तिना यांनी ताल धरलाय. गाणं संपेपर्यंत ख्रिस्तिना यांचा डान्स सुरू होता, ही पॉलिटीकल थीम आणि कॅम्पेन यामुळे हिट होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.