व्हिडिओ : बालू, लिओ आणि शेरेची अनोखी मैत्री वायरल

एक अमेरिकन अस्वल, एक आफ्रिकन सिंह आणि एक बंगालचा एक वाघ असे तिघे जण एकत्र सुखानं नांदताना एका संग्रहालयात पाहायला मिळतायत.

Updated: Mar 5, 2016, 01:25 PM IST
व्हिडिओ : बालू, लिओ आणि शेरेची अनोखी मैत्री वायरल title=

मुंबई : एक अमेरिकन अस्वल, एक आफ्रिकन सिंह आणि एक बंगालचा एक वाघ असे तिघे जण एकत्र सुखानं नांदताना एका संग्रहालयात पाहायला मिळतायत.

अमिरिकेतल्या जॉर्जिया इथल्या 'नोहझ आर्क' प्राणी संग्रहालयात हे दृश्यं दिसतंय. इथलं एक अस्वल, सिंह आणि वाघ एकत्रच राहतात, खातात, खेळतात आणि झोपतातही एकत्रच...  

यांपैकी अस्वलाचं नाव बालू, सिंहाचं नाव लिओ तर वाघाचं नाव शेरे असं आहे. २००१ साली हे तिघेही छोटे छोटे बछडे असताना त्यांना या संग्रहालयात आणण्यात आलं होतं. पोलिसांनी टाकलेल्या एका धाडीत त्यांना एका ड्रग हाऊसमधून ताब्यात घेण्यात आलं होतं. 

या तिघांच्या मैत्रीचा हा अनोखा व्हिडिओ सध्या वायरल होताना दिसतोय.