सर्वांसमोर मेलानियाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा हात झटकला

Updated: May 23, 2017, 04:58 PM IST

बेन गुर्रियन : अमेरिकन राष्ट्रपती ट्रम्प आणि यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रम्प हे आपल्या पत्नीसोबत पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर निघाल्या आहेत. याबाबतीत दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी डोनाल्ड इस्त्राईलला पोहोचले तेथे ही घटना घडली.

इस्त्राईलच्या बेन गुर्रियन एअरपोर्टला जेव्हा डोनाल्ड यांनी आपल्या पत्नीचा हात पकडण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा मेलानिया यांनी त्यांचा हात झटकला. मात्र यावेळी इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपली पत्नी साराचा हात पकडलेला होता.

अमेरिकेचे राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचा हा किस्सा कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रश्नचिन्हंही उपस्थित केलं जात आहे की, खरोखर मेलानियाने ट्रम्प यांचा हात झटकला का?

मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट ट्वीटरवर लोकांचं लक्ष सर्व कपल्सवर होतं, सोशल मीडियावर नेटीझन्सने म्हटलंय की, डोनाल्ड ट्रंप आपल्या पत्नीला मागे सोडून पुढे निघून गेले आहेत, त्याचवेळी इस्त्राईलचे पंतप्रधान पत्नीसोबत चालतायत.