VIDEO : विमानाच्या छतावर बसून अवकाश अनुभवण्याची संधी!

होय, तुम्ही खरं तेच ऐकताय, वाचताय... 'विंग्सस्पॅन' नावाच्या अमेरिकेची एरोस्पेस टेक्नोलॉजी कंपनीनं ही संधी उपलब्ध करून देण्याची तयारी केलीय. 

Updated: Dec 16, 2015, 01:25 PM IST
VIDEO : विमानाच्या छतावर बसून अवकाश अनुभवण्याची संधी! title=

मुंबई : होय, तुम्ही खरं तेच ऐकताय, वाचताय... 'विंग्सस्पॅन' नावाच्या अमेरिकेची एरोस्पेस टेक्नोलॉजी कंपनीनं ही संधी उपलब्ध करून देण्याची तयारी केलीय. 
 
या कंपनीनं एका पेटंटसाठी अर्ज केलाय. प्रवाशांना विमानाच्या आत नाही तर छतावर बसून प्रवासाची संधी देणाऱ्या 'स्कायडेक'साठी हा पेटंट आहे. 

विमानाच्या छतावर एक मोठा ट्रान्सपरन्ट फुगा लावलेला असेल. इथंवर पोहचण्यासाठी प्रवाशांना शिडीचा वापर करावा लागेल.

या फुग्यात बसून प्रवाशांना पायलटपेक्षाही स्पष्टपणे अंतराळाचा अनुभव घेता येईल. हा प्रोजेक्टची अजूनही टेस्टिंग सुरू आहे. 

कशी असेल ही सफर... त्याची कल्पना तुम्हाला या व्हिडिओतून येऊ शकेल.