VIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी

 इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.

Updated: Nov 14, 2015, 07:30 PM IST
VIDEO : शांतीनं जगू देणार नाही, इसिसनं दिली धमकी title=

पॅरिस : इसिस सध्या जागतिक धोका बनत चालल्याचं दिसतंय. फ्रान्सवरील हल्ल्याची जबाबदारी इसिसनं घेतलीय. आतपर्यंत इसिसनं अकरा देशांवर आत्मघाती हल्ले केलेत.

पॅरीस हल्ल्यानंतर फ्रान्सला चिथावणी देणारा एक व्हिडिओ इसिसनं शुक्रवारी संध्याकाळी जाहीर केलाय. शनिवारी इंटरनेटवर वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दहशतवादी संघटनेनं सीरियामध्ये सैनिक पाठवण्यावर फ्रान्समध्ये हल्ल्याची चिथावणी दिलीय. 

इसिसच्या 'अल ह्यात मीडिया सेंटर'कडून जाहीर करण्यात आलेल्या व्हिडिओत एका दाढीवाल्या दहशतवाद्यानं अरबी भाषेत धमकी दिलीय. 'जेव्हापर्यंत तुम्ही आमच्यावर बॉम्बचा वर्षाव करत राहाल तेव्हापर्यंत आम्ही तुम्हाला शांतीनं जगू देणार नाही. तुम्हाला बाजारात चालतानाही भीती वाटेल' असं तो या व्हिडिओत म्हणताना दिसतोय. 

व्हिड़िओ पाहा :- दहशतवाद्यांनी जाहीर केलेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सिरीयाबाबत फ्रान्सनं घेतलेल्या भूमिकेला इसिसनं विरोध केलाय. तर फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांच्या चुकीचा हा परिणाम असल्याचं, प्रत्यक्ष हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी म्हंटल्याचं प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय. 

शुक्रवारी सायंकाळी पॅरिसमध्ये कॉन्सर्ट, रेस्टॉरन्ट आणि स्टेडियमच्या जवळपास झालेल्या बॉम्बस्फोटांत जवळपास १५८ जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक लोक जखमी झालेत. 

फ्रान्सवर हल्ला करण्याची धमकी इसिसनं या वर्षाच्या मध्यावरच दिली होती. फ्रान्समध्ये दीड हजारांहून जास्त व्यक्ती दहशतवादी संघटनांशी संबंधीत आहेत. त्यापैकी सुमारे पाचशे जण सिरीयामधल्या इसिसशी जोडलेले आहेत. या शिवाय निर्वासितांबाबत फ्रान्सनं घेतलेलं मुक्त सीमा धोरण हेसुद्धा यासाठी कारण असल्याचं मानलं जातंय. मुक्त सीमा धोरणामुळे निर्वासीतांचे तांडेच मध्य-पूर्व तसंच उत्तर आफ्रिकेतून फ्रान्समध्ये दाखल झाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.