अर्थ अवरवर कंडोम कंपनीचा जोडप्यांना संदेश

By Prashant Jadhav | Last Updated: Thursday, March 27, 2014 - 21:18

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
२९ मार्चला अर्थ अवर साजरा केला जात आहे. स्थानिक वेळेनुसार भारत शनिवारी सायं ८.३० ते ९.३० या कालावधीत लाइट बंद करून पर्यावरण संरक्षणाच्या या वैश्विक मोहिमेला अर्थ अवर म्हटले जाते.
कंडोम निर्माण करणारी कंपनी ‘ड्युरेक्स’ने कपल्सला या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी आणि आपल्या व्यस्त जीवनातून बाहेर पडून एक-दुसऱ्यांसाठी काही क्षण देण्यासाठी एक क्रिएटीव्ह अभियान छेडले आहे.
#TurnOffToTurnOn या अभियानात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये जोडपे दिसत आहेत. ते आपल्या जोडीदारासोबत असून मानसिकरित्या वेगवेगळे आहेत. तुम्हांला व्हिडिओ दिसेल कोणी ब्रेकफास्ट करतं तर कोणी टीव्ही पाहत आहे.
नवरा बायको गाडीत बसूनही जवळ नाही. यात तुम्हांला एक गोष्ट दिसेल की प्रत्येक जण गॅजेटमध्ये गुंतलेले आहेत. आपल्या साथीदारासोबत शारीरिक रुपात आहेत, पण मानसिक रूपात ते दुसरीकडे आहेत.
व्हिडिओच्या शेवटी काय होते ते पाहणे मजेशीर आहे. या क्रिएटीव्ह व्हिडिओला आतापर्यंत ६३ लाख लोकांना पाहिले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014 - 21:18
comments powered by Disqus