गेंडा बिथरला अन्...

नेपाळच्या हेतुआदा शहरात एका पाहुण्याने अचानक भेट दिल्यानं साऱ्यांची धावपळ उडाली. 

Updated: Mar 31, 2015, 09:07 PM IST
गेंडा बिथरला अन्... title=

काठमांडू : नेपाळच्या हेतुआदा शहरात एका पाहुण्याने अचानक भेट दिल्यानं साऱ्यांची धावपळ उडाली. 

एक महाकाय गेंडा जंगलातून भरकटला आणि थेट शहरात घुसला. यावेळी झालेल्या गोंधळात हा गेंडा बिथरला आणि त्यानं केलेल्या हल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर काही नागरीक जखमी झालेत.  

हे शहर चितवन नॅशनल पार्कला लागूनच आहे. त्यामुळे गेंड्यानं आपली सीमा ओलांडल्याचं वनअधिका-यांनी सांगीतलं. दरम्यान वनकर्मचाऱ्यांनी तातडीने या गेंड्याला पुन्हा जंगलात हुसकावून लावलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.