will vanya get miss world crown?, 24taas.com

वान्या होणार ‘मिस वर्ल्ड २०१२’?

वान्या होणार ‘मिस वर्ल्ड २०१२’?
www.24taas.com, बीजिंग
यंदाचा मिस वर्ल्ड किताब कोण जिंकणार ते आज ठरणार आहे... कारण ६२ वी ‘मिस वर्ल्ड’ची स्पर्धा आज रंगणार आहे ती चीनमध्ये...

विशेष म्हणजे यावेळच्या स्पर्धेत विविध देशातल्या ११७ स्पर्धक सहभागी झाल्यात. याआधी २०१० मध्ये सहभागी झालेल्या सौदर्यवतींचा आकडा होता तो ११५ त्यामुळे यंदा सौर्द्य़वतींच्या ११७ या आकडेवारीमुळे नवा रेकॉर्ड झालेला आहे. तसंच यावेळीही भारताला मिस वर्ल्डचा किताब पडकावण्याची संधी आहे. कारण भारतातर्फे चंदीगढमध्ये राहणारी २० वर्षीय वान्या मिश्रा सहभागी झाली आहे. २०१२ ची ‘फेमिना मिस इंडिया’ बनण्याचा मान वान्या मिश्राने याआधी पटकावला होता. त्यामुळे मिस वर्ल्डच्या किताबाची आशा तिने वाढवली आहे.

याआधी भारताने पाच मिस वर्ल्डचे किताब पटकावले आहे. १९६६ मध्ये फारिया, १९९४ ऐश्वर्या राय, १९९७ मध्ये डायना हेडन, १९९९ मध्ये युक्ता मुखी आणि २००० मध्ये प्रियांका चोप्रा... मात्र जवळपास ११ वर्ष भारताच्या नावे हा मिस वर्ल्डचा किताब झालेला नाही. त्यामुळे साऱ्या भारतीयांच्या नजरा वान्या मिश्रावर आहेत. आज संध्याकाळी ५ वाजता ‘झी कॅफे’वर आपण हा मिस वर्ल्डचा कार्यक्रम थेट पाहू शकता.

First Published: Saturday, August 18, 2012, 10:16


comments powered by Disqus