पर्समध्ये कंडोम आढळल्यास स्त्रियांना समजलं जातं सेक्स वर्कर्स!

सामान्य महिलांच्या किंवा मुलींच्या पर्समध्ये कंडोम सापडल्यास त्यांना सेक्स वर्कर मानून त्यांना अटक केलं जात असल्याचं मानवाधिकार संघटनेने म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 15, 2013, 04:36 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनमध्ये वेश्या व्यवसाय बेकायदेशीर असल्यामुळे तेथील सेक्स वर्कर्सना अत्यंत पाशवी वागणूक दिली जात असल्याचे समोर आले आहे. एवढंच नव्हे, तर सामान्य महिलांच्या किंवा मुलींच्या पर्समध्ये कंडोम सापडल्यास त्यांना सेक्स वर्कर मानून त्यांना अटक केलं जात असल्याचं मानवाधिकार संघटनेने म्हटलं आहे.
चीनमध्ये वेश्याव्यवसाय बेकायदेशीर असूनही तेथे सुमारे ४० ते ६० लाख सेक्स वर्कर्स आहेत. अनेक मसाज पार्लर्स, सलोन्स येथे अशा प्रकारचे उद्योग छुप्या पद्धतीने चालतात. मात्र अशा महिलांना पकडल्यावर पोलीस त्यांना थर्ड डीग्री टॉर्चर देतात. सेक्स वर्कर्सना झाडाला बांधण्यात येतं. त्यांच्यावर बऱ्पाळ पाण्याने भिजवलं जातं. मारहाणही केली जाते.
रेड लाइट एरियामध्ये महिलांच्या सामानाची झडती घेतली जाते. कंडोम आढळल्यास महिलांना अटक केलं जातं. यामुळे घाबरून अनेक सेक्स वर्कर्स कंडोम वापरायला घाबरतात. मात्र यामुळे चीनमध्ये एचआयव्हीचं संक्रमण मोठ्या प्रमाणावर होऊ लागलं आहे. पोलिसांच्या कारवाई विरोधात मानवाधिकार संघटनांनी आवाज उठवला असून सेक्स वर्कर्सना योग्य वागणूक दिली जावी, अशी मागणी होत आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.