लग्नाबद्दल महिला होऊ लागल्यात निरुत्साही

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, July 21, 2013 - 22:55

www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
अमेरिकेत विवाह दर मोठ्या प्रमाणात घसरलाय. बाउलिंग ग्रीन स्टेट युनिव्हर्सिटीच्या राष्ट्रीय कुटुंब आणि विवाह शोध केंद्राने केलेल्या अभ्यासात विवाह दर घसरण्यास महिलांच लग्नाच्या बाबतीत निरुत्साह असल्याचे समोर आलेय. आता महिला विवाहासाठी जास्त प्रतीक्षा करीत आहेत.
आकडेवारीवर नजर टाकली असता १०० पैकी फक्त ३१ महिलाच विवाह करीत असल्याचे समोर आलेय. १९२० मध्ये हेच प्रमाण ९२.३ होते. १९७० च्या दशकात हे प्रमाण घटून ६० टक्क्यांपर्यंत आलं. विवाह करणे हे काही गरजेचे राहिलेले नाही. काही जोडपी एकत्र राहणे पसंत करतात तर काही एकएकटे राहणे पसंत करतात. असे एनसीएफएमआरच्या सहनिर्देशक डॉक्टर सुजैन ब्राउन यांनी सांगितले.
पुरुष आणि महिलांच्या पहिल्या विवाहाचे वय सातत्याने वाढत चाललं असूंन त्याने आता उच्चांक गाठलाय, असं केंद्राच्या संहसंचालक डॉ. वॅडी मेनिंद म्हणाल्या. याबरोबरच घटस्फोट देणाऱ्या आणि एकटे राहणाऱ्या महिलांच्या संख्येतही वाढ होतेय. १९२० मध्ये महिलांच्या घटस्फोटाचे प्रमाण एका टक्क्याहून कमी होते. आता ते वाढून १५ टक्के इतका झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, July 21, 2013 - 22:55
comments powered by Disqus