जगातल्या सर्वात उंच व्यक्तीचा मृत्यू

Last Updated: Tuesday, August 26, 2014 - 21:20

लंडन:  जगातला सर्वात उंच व्यक्तीचा वयाच्या ४४ व्या वर्षी मृत्यू झाला. युक्रेनमध्ये शेतकरी असलेला लियोनीद स्तादनीक हा व्यक्ती पोदोलीयांत्सी गावात रहात होता.

लियोनीद स्तादनीकची उंची 8 फूट 4 इंच होती. मेंदूत रक्तस्राव झाल्याने रविवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला.

स्तादनीकचे पाय 18 इंच तर हाथाचा पंजा एक फूटपेक्षा जास्त होता. सामान्य खाट त्याला पुरत नसत त्यामुळे तो बिलीयर्ड टेबलवर झोपत असे. हा व्यक्ती स्वभावाने लाजाळू असल्याने त्याने कधीही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डससाठी आपलं नाव दिलं नाही.

स्तादनीकने एकदा म्हटलं होत की, ‘माझ्यासाठी माझी उंची शाप आहे, देवाची शिक्षा आहे. याचा मला आनंद नाही. मला प्रसिद्ध होण्याची इच्छा नाही. त्यामुळे मी गिनीज बुकसाठी माझ नाव दिलं नाही.

स्तादनीक जेव्हा 12 वर्षाचा होता तेव्हा त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्याच्या शरीरात उंची वाढवणारा हारमोन्सचं स्राव वाढला. प्रत्येक वर्षात या व्यक्तीची उंची एक फूटाने वाढायची.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसच्या एका प्रवक्त्यानुसार त्यांनी स्तादनीकशी संपर्क केला होता पण तो खूप लाजाळू व्यक्ती होता.

जगातला सर्वात उंच जीवित व्यक्तीचा गिनीज रेकॉर्ड तुर्किच्या सुलतान कोसेनच्या नावावर आहे. फेब्रुवारी 2011 मध्ये त्याची उंची 8 फूट 3 इंच इतकी होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 First Published: Tuesday, August 26, 2014 - 21:19


comments powered by Disqus