'इसिस'च्या दहशतवाद्यांना किती पगार मिळतो माहित आहे...

दहशतवादी संघटना 'इसिस'च्या दहशतवाद्यांना या संघटनेत सामील होण्यासाठी किती पगार मिळतो, हे समजलं तर तुम्हाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. 

Updated: Oct 17, 2015, 07:28 PM IST
'इसिस'च्या दहशतवाद्यांना किती पगार मिळतो माहित आहे... title=

नवी दिल्ली : दहशतवादी संघटना 'इसिस'च्या दहशतवाद्यांना या संघटनेत सामील होण्यासाठी किती पगार मिळतो, हे समजलं तर तुम्हाला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. 

या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी अनेक तरुणांना विविध प्रलोभनं देऊन आपल्याकडे आकर्षित केलं जातं. गलेलठ्ठ पगाराचं आमिष दाखवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं जातं. 

या नव दहशतवाद्यांना किती पगार दिला जातो, याची चाचपणी नुकतीच युनायटेड नेशन्सच्या एका टीमनं केली. यावेळी धक्कादायक माहिती उघड झालीय. 

दहशतवादी आणि क्रूर कृत्य केल्यास भरती करून घेण्यात आलेल्या दशतवाद्याला पगाराव्यतिरिक्ता वेगवेगळे भत्तेही दिले जातात. इतकंच नाही, तर या नव दहशतवाद्यांची लैंगिक भूक भागवण्यासाठी अनेक मुलीही पुरवल्या जातात. अपहरण करण्यात आलेल्या अनेक मुलींना इसिसनं या कामी लावलंय, हे अनेकदा समोर आलंय. इसिसच्या लिडर्सनं अनेक मुलींची इसिसच्या दहशतवाद्यांशी लग्न करण्यासाठी निवडही केलीय.  

युनायटेड नेशन्सच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार, सिरिया आणि इराकमध्ये युद्धासाठी निवडण्यात आलेल्या तरुणांना जवळपास 10,000 डॉलर्स इतका पगार दिला जातो. म्हणजेच, या तरुणांना वार्षिक जवळपास सहा लाख रुपये मिळतात... आणि तेही कोणत्याही टॅक्सशिवाय... इसिसमध्ये दहशतवाद्यांना महिन्याला कमीत कमी 3000 डॉलर्स इतका पगार मिळतो. 

हा पगार दहशतवाद्याच्या तांत्रिक शिक्षणावरही अवलंबून असतो. डॉक्टर, इंजिनिअर, कॉम्प्युटर एक्स्पर्टस् आणि इतर तांत्रिक गोष्टींचं ज्ञान असणाऱ्यांना अधिकाधिक पगार इथं मिळतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.