डोकं बाजुला ठेऊन पाहा अक्षयचा ‘एन्टरटेन्मेंट’

Last Updated: Friday, August 8, 2014 - 20:23
डोकं बाजुला ठेऊन पाहा अक्षयचा ‘एन्टरटेन्मेंट’

जयंती वाघधरे, झी मीडिया प्रतिनिधी, मुंबई : हॉलिडे या सिनेमानंतर आता अक्षय कुमारचा कॉमेडी जॉनर असलेला एन्टरटेन्मेंट हा सिनेमाया आठवड्यात आपल्या भेटीला आलाय.. सुरुवात करुया एन्टरटेन्मेंट या सिनेमाच्या कथेपासून..


 

कथा
या सिनेमात एक नाही तर दोन लीड कॅरेक्टर्स आहेत.. एक अभिनेता अक्षय कुमार तर दुसरा तो कुत्रा ज्यानं सिनेमात एन्टरटेन्मेंट नावाचं कॅरेक्टर साकारलंय.

अखिल लोखंडे नावाची व्यक्तिरेखा यात अक्षयनं बजावली आहे. हा अखिल लोखंडे एक साधारण मिडल क्लास तरुण असतो ज्याला अचानक एके दिवशी आपलं खरं अस्तित्व कळतं.. पन्नालाल जोहरी नावाच्या बँकॉक स्थित एका प्रसिद्ध उद्येगपतीचा तो मुलगा असण्याचं जेव्हा त्याला समजतं, तो पर्यत खूप उशीर झालेला असतो.. पन्नालाल जोहरीचं अर्थातच त्याच्या पित्याचं मृत्यू झालेलं असतं.. आता प्रश्न उरतो पन्नालाल जोहरीच्या प्रॉपर्टीचा.. 3000 कोटींच्या या प्रॉपर्टीसाठी हा अखिल लाखंडे थेट बँकॉकला पोहचतो..

तिथे गेल्यानंतर एक वेगळंच सत्य त्याच्या समोर येतं.. ते म्हणजे, ही 3000 कोटींची प्रॉपर्टी एन्टरटेन्मेंट नावाच्या एका कुत्र्याच्या नावावर केलेली असते.. यानंतर काय धमाल उडते.. त्या पैशांसाठी, त्यावर हक्क गाजवण्यासाठी कशा प्रकारचा खेळ रचला जातो या बद्दलचा हा सिनेमा आहे..

अभिनय

अक्षय कुमार, अक्षय कुमार आणि अक्षय कुमार.. हा सिनेमा पहिल्यावर तुमच्या लक्षात राहतो तो फक्त अक्षय कुमार.. कॉमेडी शेडचा सिनेमा असल्यामुळे अक्षय कुमार एन्टरटेन्मेंटमध्ये तुम्हाला पोट धरुन हसायला लावतो.. त्याची विनोद निर्मीतीची खास शैली यात धमाल उडवून देते.. अक्षयचा अभिनय इतका सरळ आहे, इतका इझी गोइंग वाटतो पण तरी त्याचे पंचेस, त्याची डायलॉग डिलेव्हरी या ,सगळ्या गोष्टी तुमचं मनोरंजन करतात, तुम्हाला हसवतात.

अक्षय कुमारसोबतच यात तुम्हाला हसवण्यासाठी आणखी काही पात्रांचा समावेश करण्यात आलाय.. क्रिष्णा, मिथून चक्रवर्ती,जॉनी लिव्हर यांनीही यात जबरदस्त बॅटिंग केली आहे..

अभिनेत्री तमन्ना भाटीयानं यात ठिकठाक काम केलंय.. खरंतर ती केवळ नाच गाण्यापुरतीच यात पहायला मिळते..

प्रकाश राज आणि सोनू सूद या दोघांनी यात नेगेटीव्ह भूमिका साकारल्या आहेत.. करण अर्जुन नावाची व्यक्तीरेखा त्यांनी बजावली आहे.. स्लॉपस्टीक कॉमेडी बेस सिनेमा असल्यामुळे या दोघांनाही ह्युमर क्रिएट करण्यासाठी भरपूर स्कोप मिळालाय.. आणि या दोघांनी ते साकारण्यात ब-यापैकी यश मिळवलंय.. विशेष करुन अभिनेता प्रकाश राज ज्यानं सिंघम, दबंग सारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप सोडली, त्यानं एन्टरटेन्मेंट या फिल्म मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स दिला आहे.

दिग्दर्शन
सिनेमाचं दिग्दर्शन आणि स्र्किनप्ले साजिद फर्हाद या जोडीनं केलंय.. हा सिनेमा पाहताना तुम्हाला नक्कीच डोकं बाजुला ठेउन सिनेमा पाहावा लागेल. कारण दिग्दर्शकानं केवळ कॉमेडीच्याच अँगलनं सिनेमाचा स्क्रिनप्ले लिहलाय आणि त्याच पद्धतीनं एन्टरटेन्मेंट या सिनेमाला ट्रिटमेंट दिली आहे.. अनेक ठिकाणी संदर्भहीन गोष्टी घडतात..त्यामुळे फिल्म पाहताना कुठल्याही प्रकारचा संदर्भ लावणे कठीण आहे..

संगीत
एन्टरटेन्मेंट सिनेमाला संगीत दिलंय सचिन जिगर या संगीतकार जोडीनं.. तेरा नाम दु, आतिफ असलम आणि शालमली खोलगडेच्या आवाजातलं हे गाणं चार्टबस्टर ठरतंय. त्याचबरोबर विरे दी वेड्डींग, जॉनी जॉनी ही गाणीही सध्या खूप गाजतायेत.. इन शॉर्ट सिनेमाच्या थिमप्रमाणे जाणारं सिनेमाचं संगीत आहे..

सारंश
एन्टरटेन्मेंट हा सिनेमा तुम्हाला केवळ हसवतो आणि तुमचं मनोरंजन करतो.. मी म्हटलं त्या प्रमाणे कुठल्याही प्रकारचा लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करु नका.. या सिनेमातली आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे, सिनेमातले डायलॉग्ज, अभिनेता कृष्णा, जॉनी लिवर, प्रकाश राज या कलावंतांच्या वाट्याला आलेले डायलॉग्ज खूप नवीन वाटतात, मजेशीर वाटतात.. ह्या स्क्रिप्टमुळे, खास सिनेमातल्या संवादामुळे सिनेमा पहायला आणखी मजा येते.. जर तुम्हाला वैचारिक आणि अर्थपूर्ण सिनेमा बघायची आवड असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी नाही पण जर तुम्हाला टाइमपास करायचाय, तुम्हाला कॉमेडी सिनेमे आवडत असतील, केवळ एन्टरटेन्मेंटसाठी सिनेमा बघायचाय तर नक्कीच एन्टरटेन्मेंट हा सिनेमा तुमच्यासाठी एक ठिकठाक ऑप्शन आहे.. ही फिल्म एक वन टाइम वॉच फिल्म  आहे..

रेटींग
कॉमेडी, कन्फ्युजन, ड्रामा, भरपूर एन्टरटेन्मेंटचं मिश्रण असलेला एन्टरटेन्मेंट सिनेमा, अक्षय कुमार, क्रिष्णा, जॉनी लिव्हर, मिथुन चक्रवर्ती, प्रकाश राज सारख्या कसलेल्या कलावंतांच्या जबरदस्त अभिनयासाठी मी देतेय साडेतीन स्टार्स

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Friday, August 8, 2014 - 20:14
comments powered by Disqus