ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव

नवी दिल्लीत ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान सोहळा पार पडतोय. 

Updated: May 4, 2016, 12:06 AM IST
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव title=

मुंबई : ६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा राजधानी दिल्लीमध्ये मोठ्या दिमाखात फार पडला. राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या मान्यवरांचा यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला.

- ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरविण्यात आलं. यावेळी मनोज कुमार यांच्या कारकिर्दीवरील एक चित्रफितही दाखविण्यात आली. टाळ्यांच्या गजरात राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

- राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडाही मोठ्या दिमाखात फडकला.

- कट्यार काळजात घुसली सिनेमातील गायनासाठी महेश काळेंचा गौरव करण्यात आला.

- रिंगणला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा

- तर नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराटफेम रिंकु राजगुरूला विशेष लक्षवेधी अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

- मिथुनचंद्र चौधरी दिग्दर्शित पायवाट या लघुपटाला सर्वोत्कृष्ट शैक्षणिक लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- 'पिकू'मधल्या अभिनयासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता 

- तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना राणावतचा सन्मान करण्यात आला. कंगणाने सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवलीय.

- सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून बाहुबलीचा गौरव केला गेला. तर संजय लीला भन्साळींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा बहुमान मिळालाय. 

- संजय लीला भन्साळी यांना पुरस्कार प्रदान

 

इथे पाहा, हा सोहळा