कॅटरिनाला अभिनेत्याने पाठवला गुलाबांनी भरलेला ट्रक

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कॅफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा बऱ्याच काळ रंगतायंत. ब्रेकअपवर बोलणं आणि एकमेकांसमोर येणे हे दोघेही टाळतांयत. त्यानंतर आता कॅटरिनाला रोज डे ला गुलाबाच्या फुलांनी भरलेला एक ट्रक पाठवला आणि ते फूलं कोणी पाठवले याची चर्चा रंगू लागली.

Updated: Feb 8, 2016, 01:46 PM IST
कॅटरिनाला अभिनेत्याने पाठवला गुलाबांनी भरलेला ट्रक title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कॅफ आणि रणबीर कपूर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा बऱ्याच काळ रंगतायंत. ब्रेकअपवर बोलणं आणि एकमेकांसमोर येणे हे दोघेही टाळतांयत. त्यानंतर आता कॅटरिनाला रोज डे ला गुलाबाच्या फुलांनी भरलेला एक ट्रक पाठवला आणि ते फूलं कोणी पाठवले याची चर्चा रंगू लागली.

बॉलिवूड अॅक्टर आदित्य राय कपूर आणि कॅटरिना कॅफे यांचा फितूर हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. गुलांबानी भरलेला हा ट्रक दुसरं कोणी नाही तर आदित्य रॉय कपूर यांनीच पाठवला होता. 

१२ फेब्रवारी रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमात तबू, अदितीराव हैदरी, राहुल भट्ट, अक्षय ऑबेरॉय, अजय देवगण हे सिने कलाकार देखील दिसणार आहे.