'दंगल'चा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाईचा गल्ला

अमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने  बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमविला आहे. केवळ ५ दिवसांत १५५ कोटींची कमाई केली आहे.  

Updated: Dec 28, 2016, 02:58 PM IST
'दंगल'चा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाईचा गल्ला title=

मुंबई : अमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने  बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमविला आहे. केवळ ५ दिवसांत १५५ कोटींची कमाई केली आहे.  

या सिनेमाने १०० कोटींची टप्पा पहिल्या तीन दिवसांमध्ये पार केला होता.अमिर खानच्या 'दंगल' या सिनेमाने अनेक विक्रम मोडीत काढले असून नवनवीन विक्रम केले आहेत. 
 
दंगल' या सिनेमाच्या माध्यमातून १०० कोटी क्लबमध्ये अमिरच्या या सिनेमाचा समावेश झाला आहे. याआधी गजनी, धूम, ३ इडियट्स आणि पीके चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

'दंगल'मध्ये अमिर खान सुप्रसिद्ध कुस्तीपटू महावीर फोगट यांची भूमिका साकारत आहे. त्याने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक होत आहे. नवख्या कलाकारांनीही तेवढीच मेहनत घेतली आहे.

या सिनेमात महावीर फोगट यांनी आपल्या दोन मुली, गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले, ही कथा मांडण्यात आली आहे.