आमिरने सनी लिऑनला केला फोन आणि बोलला...

आमिर खान काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'दंगल'च्या शुटींगसाठी दिल्लीत आहे. त्यादरम्यान आमिरला जेव्हा हे माहित पडलं की सनी लिऑन ही दिल्लीत आहे. तेव्हा आमिर खानने तिला फोन करून लंचसाठी आमंत्रीत केलं.

Updated: Feb 9, 2016, 01:44 PM IST
आमिरने सनी लिऑनला केला फोन आणि बोलला... title=

नवी दिल्ली : आमिर खान काही दिवसांपासून त्याचा आगामी चित्रपट 'दंगल'च्या शुटींगसाठी दिल्लीत आहे. त्यादरम्यान आमिरला जेव्हा हे माहित पडलं की सनी लिऑन ही दिल्लीत आहे. तेव्हा आमिर खानने तिला फोन करून लंचसाठी आमंत्रीत केलं.

आमिर ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे तेथेच त्याने तिला लंचसाठी बोलावलं होतं. सनी लिऑन तिच्या पतीसह आमिरच्या भेटीला पोहोचली. सनी लिऑनीने आमिरला भेटीसाठी बोलावल्यामुळे थँक्यू देखील म्हटलं आहे.

आमिर खानने म्हटलं की, मला तुझ्यासोबत काम करण्यात काहीच हरकत नाही. संधी मिळाली तर सनीसोबत नक्की काम करेल. याआधीही सनी लिऑनी जेव्हा ही वादात आली तेव्हा आमिर खान तिच्या सरर्थनात बोलत होता.