सलमान-शाहरुख एकत्र पाहणार आमिरचा ‘पीके’?

सध्या बॉलीवूड अभिनेते सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सलमानची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या निमित्तानं शाहरुख आणि सलमानमध्ये काही मैत्रिचे क्षण दिसून आले. तसंच नुकत्याच झालेल्या एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान आमिर, सलमान आणि शाहरुख एकत्र दिसले होते. 

Updated: Dec 5, 2014, 03:53 PM IST
सलमान-शाहरुख एकत्र पाहणार आमिरचा ‘पीके’? title=

मुंबई : सध्या बॉलीवूड अभिनेते सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सलमानची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या निमित्तानं शाहरुख आणि सलमानमध्ये काही मैत्रिचे क्षण दिसून आले. तसंच नुकत्याच झालेल्या एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान आमिर, सलमान आणि शाहरुख एकत्र दिसले होते. 

आता ही मैत्री आणखीच बहरत चाललीय. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान आणि शाहरुख एकत्र बसून आमिर खानचा आगामी सिनेमा ‘पीके’ पाहणार आहेत. 

आमिरनं आपल्या दोन्ही मित्रांसाठी ‘पीके’चं स्पेशल स्किनिंग आयोजित केलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर आपल्या सिनेमाची पहिली कॉपी सलमान आणि शाहरुखला दाखवणार आहे.

आमिर खान आपल्या खास मित्रांसोबत म्हणजेच सलमान आणि शाहरुखसाठी स्पेशल प्रिव्ह्यू प्लान करतोय, असं मानलं जातंय. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत तिघांनीहीह ‘पीके’ सिनेमावर बराच वेळ चर्चा केली. 

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान आणि शाहरुखनंही हा सिनेमा पाहण्याची इच्छा यावेळी व्यक्त केली. यानंतर आमिरनं सलमान आणि शाहरुखसाठी ‘पीके’चं स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्याचा निर्णय घेतलाय. 

ख्रिसमसच्या मुहूर्तावर ‘पीके’ हा सिनेमा येत्या १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आमिरशिवाय अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.