आशा भोसले-साधना सरगम यांची हिरोसाठी जुगलबंदी

एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 20, 2017, 01:40 PM IST
आशा भोसले-साधना सरगम यांची हिरोसाठी जुगलबंदी

मुंबई : आपल्या  सूरांच्या जादूने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी आगामी ‘हिरो’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र गीत गायलं आहे.

आशा भोसले आणि साधना सरगम यांच्या या जुगलबंदीवर अभिनेत्री दिपाली सय्यद व  सुखदा खांडकेकर यांचा भन्नाट नृत्याविष्कार पहायला मिळणार आहे. 

एन.एन सिद्दिकी दिग्दर्शित‘हिरो’ चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रीत करण्यात आलं आहे.