अभिषेकला साकारायचीय 'युवी'ची भूमिका

बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन यानं सिल्वर स्क्रिनवर युवराज सिंगची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केलीय. 

Updated: Mar 19, 2015, 01:29 PM IST
अभिषेकला साकारायचीय 'युवी'ची भूमिका title=

मुंबई : बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन यानं सिल्वर स्क्रिनवर युवराज सिंगची व्यक्तीरेखा साकारण्याची इच्छा व्यक्त केलीय. 

सध्या बॉलिवूडमध्ये खऱ्याखुऱ्या आयडॉल्सच्या जीवनावर आधारित असे सिनेमे आपल्या कुवतीप्रमाणे बनवण्याचा आणि ते प्रेक्षकांसमोर आणण्याचा ट्रेन्ड सुरू आहे. सध्या, सुशांत सिंह राजपूत क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी याच्या जीवनावर आधारित तर इमरान हाश्मी मोहम्मद अजहरुद्दीनच्या जीवनावर आधारित सिनेमांमध्ये बिझी आहेत. 

अभिषेकला कोणत्या खऱ्याखुऱ्या आयडॉलची भूमिका करायला आवडेल, असा प्रश्न जेव्हा त्याला विचारण्यात आला तेव्हा त्यानं झटकन युवराज सिंगचं नाव घेतलं.  'युवराजचं आयुष्य अनेकांना प्रेरणा देणारं आहे. मला त्याच्या व्यक्तीगत जीवनाबद्दल बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, त्यामुळे मला त्याच्या जीवनावर सिनेमा बनवण्याची इच्छा आहे' असं अभिषेकनं म्हटलंय.  

युवराजने त्याच्या जीवनावर आधारीत 'द टेस्ट ऑफ माय लाईफ' हे पुस्तकही  लिहिलंय. अशा व्यक्तीवर सिनेमा बनवायचा असेल तर त्या व्यक्तारेखेला पूर्ण न्याय देण्याची जवाबदारीही आपलीच असते, याचीही अभिषेकला जाणीव आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.