अभिजितच्या वादग्रस्त वक्तव्याला #अकलेचेचाँदतारे हॅश टॅग

गायक अभिजीत भट्टाचार्यने ट्वीटरवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रस्त्यावर झोपणे हे आत्महत्या करण्यासारखं आहे. 

Updated: May 6, 2015, 03:13 PM IST
अभिजितच्या वादग्रस्त वक्तव्याला #अकलेचेचाँदतारे हॅश टॅग title=

मुंबई  : गायक अभिजीत भट्टाचार्यने ट्वीटरवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रस्त्यावर झोपणे हे आत्महत्या करण्यासारखं आहे. 

जे फुटपाथवर झोपतात ते मुर्ख असतात, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. तसेच पुढे अभिजितने असंही म्हटलं आहे की, मला वर्षभर घर नव्हतं, तरीही मी काही रस्त्यावर झोपलो नव्हतो.

तसेच कुत्रा जर रोडवर झोपेल, तर कुत्र्याप्रमाणेच मारला जाईल. अभिजितने म्हटलं आहे की, रस्ता गरिबांच्या बापाचा नाही.

मुंबई : गायक अभिजित भट्टाचार्यने गरीबांची थट्टा केली आहे, जो फुटपाथ पे सोयेगा, कुत्ते की मौत मारा जायेगा असं म्हणत, अप्रत्यक्षपणे फुटपाथवर झोपणाऱ्यांची तुलना कुत्र्याशी केली आहे. 

रस्ता गरिबांच्या बापाचा नाही, माझ मुंबईत वर्षभर घर नव्हतं, तरीही मी कधी फुटपाथवर झोपलो नाही, असा दाखला देखिल अभिजितने दिला आहे.

एका जबाबदार व्यक्तीने, गायकाने सलमान खानच्या शिक्षेवर प्रतिक्रिया देतांना अशी प्रतिक्रिया देणे कितपत योग्य आहे. गायक अभिजित यांचा तोल सुटलाय का?, त्यांनी अकलेचे चाँद तारे तोडले आहेत. यावर ट्ववीटरवर तसेच फेसबुकवर चर्चा करतांना  #अकलेचेचाँदतारे असा हॅशटॅग द्या.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.