सीमावासियांसंदर्भात मोहन जोशींचं वादग्रस्त वक्तव्य

 अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त विधानामुळं बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. एकीकडे बेळगावात मराठीचा एल्गार मोठा होत असताना नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Updated: Dec 11, 2014, 03:22 PM IST
सीमावासियांसंदर्भात मोहन जोशींचं वादग्रस्त वक्तव्य title=

बेळगाव:  अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या वादग्रस्त विधानामुळं बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. एकीकडे बेळगावात मराठीचा एल्गार मोठा होत असताना नाट्यसंमेलनाच्या निमित्तानं पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नाट्य संमेलन कलावंतांचं संमेलन आहे. राजकारण्यांचं नाही, बेळगाव प्रश्नाविषयी तळमळ तळमळ दाखवणं माझं काम नाही, असं जोशी म्हणालेत. ते दाखवण्याचे रंगमंच वेगळे असतात अशी भूमिका जोशी यांनी घेतली आहे. नाट्यसंमेलनासाठी कर्नाटक सरकारच्या आर्थिक मदतीमुळं बेळगाव प्रश्नी भूमिका घेण्याचं टाळलं जातंय, असा आरोप बेळगाव एकीकरण समितीनं केलाय.

दरम्यान मोहन जोशींच्या या वक्तव्य़ानंतर आता प्रचंड नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीनं याचा निषेध केला असून नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेनं जोशींच्या विधानाशी सहमत नसल्याचं म्हटलंय. जोशी यांनी आपलं विधान मागे घेऊन माफी मागावी, अशा मागणीचा ठराव करण्यात आलाय. 

पुढील वर्षी बेळगावमध्ये फेब्रुवारी महिन्यात तीन दिवसांचं संमेलन घेण्यात येणार होतं, मात्र आता ते अडचणीत सापडलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.