सलमानला भेटण्यासाठी सेटवर पोहचली ऐश्वर्या!

हिट अॅंड रन केसमध्ये जामीन मिळाल्यानंतर सलमान खान 'बजरंगी भाईजान'च्या शुटिंगसाठी काश्मिरमध्ये दाखल झाला आहे. ज्यावेळी सलमान सेटवर पोहचला तेव्हा त्याला भेटण्यासाठी ऐश्वर्या तेथे आली होती. 

Updated: May 12, 2015, 03:25 PM IST
सलमानला भेटण्यासाठी सेटवर पोहचली ऐश्वर्या! title=

नवी दिल्ली: हिट अॅंड रन केसमध्ये जामीन मिळाल्यानंतर सलमान खान 'बजरंगी भाईजान'च्या शुटिंगसाठी काश्मीरमध्ये दाखल झाला आहे. ज्यावेळी सलमान सेटवर पोहचला तेव्हा त्याला भेटण्यासाठी ऐश्वर्याही इथं दाखल झाली.  

ऐश्वर्याने सलमानचे अनेक पेटिंग्स रेखाटली आहेत. त्यातील एक पेटिंग सलमानला गिफ्ट देण्यासाठी ती 'बजरंगी भाईजान'च्या सेटवर पोहचली होती. मात्र, सलमानच्या व्यस्त शेड्युलमुळे तिची सलमानशी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर ऐश्वर्याने सलमानची खास मैत्रीण सोनाक्षीशी संपर्क साधला आणि तिला हे पेटिंग गिफ्ट केली. 

काश्मीरमध्ये राहणारी ऐश्वर्या चौबे सलमानची मोठी फॅन आहे. ती पेंटर आहे, मात्र सनमानच्या आवडीने ती सिनेमात आली आहे. सोनाक्षी सिन्हा स्टारर 'अकिरा' या सिनेमात ऐश्वर्या दिसणार आहे. याआधी ऐश्वर्या सलमानला भेटणार तोच, सलमान सत्र न्यायलयात हजर होण्यासाठी काश्मीरमधून मुंबईला निघून आला होता. त्यामुळे सलमानला भेटण्याचं ऐश्वर्याचं स्वप्न सध्या तरी अपूर्णच राहिलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.