कार्यक्रमात दुर्घटना... आलियाचा हात भाजला!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एका एन्टरटेन्मेंट अवॉर्ड कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना गंभीररित्या भाजलीय. 

Updated: Dec 15, 2015, 05:44 PM IST
कार्यक्रमात दुर्घटना... आलियाचा हात भाजला! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही एका एन्टरटेन्मेंट अवॉर्ड कार्यक्रमात परफॉर्मन्स सादर करताना गंभीररित्या भाजलीय. 

ही घटना रविवारी घडलीय. बिग स्टार एन्टरटेन्मेंट स्टेजवर परफॉर्मन्स देताना स्टेजजवळ आतिषबाजी करण्यात आली होती. यातील काही ठिणग्या आलियाच्या चेहऱ्यावर आणि हातावरही उडाल्या. यामुळे, आलियाच्या हात चांगलाच भाजला.

अचानाक घडलेल्या या दुर्घटनेनंतर आलियाला ताबडतोब स्टेजच्या पाठिमागे नेण्यात आलं आणि प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर, लगेचच जवळच्याच एका हॉस्पीटलमध्ये आलियाला हलवण्यात आलं. 

Alia Bhatt
आलियाच्या हातावर खुणा

यानंतर, आलियाच्या चाहत्यांनी तिला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावर, आलियानंही आपला एक फोटो शेअर करून आपणं बरं असल्याचं तिच्या चाहत्यांना कळवलंय.

 

यापूर्वी आलिया शाहीदसोबत 'शानदार' या सिनेमात दिसली होती. तर लवकरच, ती उडता पंजाब, कपूर अॅन्ड सन्स, शुद्धी या सिनेमांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.