असा दिसेल 'दंगल'मध्ये आमिर खान!

आमिर आपल्या फॅन्सना सरप्राइज देण्यासाठी ओळखला जातो. आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना जिंकणारा आमिर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे. जो सर्वांची वाहवा लुटतो आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा नवा रेकॉर्ड बनविण्यासाठी ओळखला जातो. आमिरचा चित्रपट 'पीके'नं विरोधामध्येही चांगली कमाई केलीय.

Updated: Jan 31, 2015, 05:49 PM IST
असा दिसेल 'दंगल'मध्ये आमिर खान! title=

मुंबई: आमिर आपल्या फॅन्सना सरप्राइज देण्यासाठी ओळखला जातो. आपल्या परफॉर्मन्सने सर्वांना जिंकणारा आमिर बॉलिवूडचा असा अभिनेता आहे. जो सर्वांची वाहवा लुटतो आणि बॉक्स ऑफिसवर सुद्धा नवा रेकॉर्ड बनविण्यासाठी ओळखला जातो. आमिरचा चित्रपट 'पीके'नं विरोधामध्येही चांगली कमाई केलीय.

काही महिन्यांपासून आमिरच्या अपकमिंग फिल्मबद्दल चर्चेला उधाण आलंय. मिळालेल्या माहितीनुसार आमिर त्याचा आगामी चित्रपट 'दंगल'मध्ये रेसलरच्या भूमिकेत दिसणार आहे. ही फिल्म महान रेसलर महावीर फोगट यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मात्र आमिर अजूनही आपल्या नव्या चित्रपटाबद्दल सांगणं टाळतोय.

नुकतंच आमिरला त्याची पत्नी किरण रावसोबत स्पॉट केलं गेल. या फोटोमध्ये आमिरची बॉडी पाहून वाटतं की 'गजनी' सारखाच आमिर या चित्रपटातासाठी आपलं वजन वाढवतोय.

या फिल्मसाठी आमिर खान वजन वाढवून नव्या लूकमध्येच आपल्याला दिसणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.