एकेकाळी अमिताभ बच्चन-विनोद खन्ना प्रतिस्पर्धी

अभिनेता विनोद खन्ना हे बॉलीवूडमधील स्मार्ट हिरोंपैकी एक होते. १९८० साली अशी वेळ आली होती की, अभिताभ आणि विनोद खन्ना यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 27, 2017, 12:56 PM IST
एकेकाळी अमिताभ बच्चन-विनोद खन्ना प्रतिस्पर्धी title=

मुंबई : अभिनेता विनोद खन्ना हे बॉलीवूडमधील स्मार्ट हिरोंपैकी एक होते. १९८० साली अशी वेळ आली होती की, अभिताभ आणि विनोद खन्ना यांच्या सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. 

महानायक अभिताभ बच्चन यांचं स्टारडम विनोद खन्ना संपवेल अशी वेळ आली होती. मात्र अचानक विनोद खन्ना हे अध्यात्माकडे वळले, आणि त्यांनी बॉलीवूडचं काम सोडलं.

मात्र जेव्हा विनोद खन्ना अध्यात्माकडून फिल्म इंडस्ट्रित परतले, पदार्पणही शानदार होतं, मात्र काळ विनोद खन्नांसाठी थांबला नव्हता.

 कारण विनोद खन्ना यांना त्या तोडीची भूमिका मिळाली नाही, आणि मिळाली तर प्रेक्षकांनी तेवढा प्रतिसाद दिला नाही.

विनोद खन्ना यांनी यानंतर खासदारकी आणि मंत्रीपदही भूषवलं, याशिवाय त्यांनी काही भूमिकाही सिनेमात पार पाडल्या.