बिग बींनी पूर्ण केली तिची इच्छा

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एका कॅन्सरग्रस्त मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला आहे.

Updated: May 21, 2016, 09:10 PM IST
बिग बींनी पूर्ण केली तिची इच्छा title=

मुंबई: बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी एका कॅन्सरग्रस्त मुलीबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला आहे. अमिताभ बच्चन यांची हार्दिका नावाच्या मुलीबरोबर भेट झाली. माझ्या वाढदिवसाचा केक अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीमध्ये कापण्यात यावा अशी इच्छा तिनं व्यक्त केली.

अमिताभ बच्चन यांनीही मग हार्दिकाची इच्छा पूर्ण केली आणि तिच्या वाढदिवसाचे फोटो ब्लॉगवर टाकले. 

हार्दिका सारखी कॅन्सर झालेल्या मुलीनं मला भेटायची इच्छा व्यक्त केली होती. हार्दिका एक चांगली आणि विनम्र मुलगी आहे. ऑक्सिजन कंटेनर घेऊन ती फिरत असते. त्रास आणि हरवलेल्या आशेचा सामना करणं खूप कठीण असतं, असं या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहीलं आहे.