बीग बींना मिळाला 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार

बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांना इंटरनेट अॅन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. 

Updated: Jan 15, 2015, 11:14 AM IST
बीग बींना मिळाला 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार title=

मुंबई : बॉलिवूडचा मेगास्टार अमिताभ बच्चन यांना इंटरनेट अॅन्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियानं 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. 

अमिताभ सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असणारा अभिनेता तसंच ऑनलाईन ब्लॉगर म्हणून चर्चेत असतात.  हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ७२ वर्षीय बीग बींनी आपल्या ऑनलाईन फॅन्सना धन्यवाद दिलेत. याच ऑनलाईन मेळ्याला बीग बी प्रेमानं आपला 'विस्तारीत परिवार' संबोधतात. 

'आयएएमएआय' भारतासाठी एक सोशल मीडिया संघ आहे... त्यांच्याकडून मला 'सोशल मीडिया पर्सन ऑफ द इअर' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय... त्यामुळे, ही वेळ माझ्या विस्तारीत परिवाराला धन्यवाद देण्याची आहे... तुम्हीच आहात ज्यांनी मला हा पुरस्कार मिळवून दिलाय, असं अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय.

दिल्लीत झालेल्या पुरस्कार सोहळ्यात बीग बी सहभागी न होऊ शकल्यानं 'आयएएमएआय'नं बीग बींना हा पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन प्रदान केलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.