बिग बीं ना ट्विटरवर कविता शेअर करणं पडलं महाग, १ कोटींचा दावा

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना सावधान करणारी एक बातमी आहे. बॉलिवडूचा शहेनशाह अमिताभ बच्चन सध्या वादात सापडले आहेत. बिग बींना फेसबूकवर कविता टाकणं महागात पडण्याची शक्यता आहे. 

Updated: May 28, 2015, 02:05 PM IST
बिग बीं ना ट्विटरवर कविता शेअर करणं पडलं महाग, १ कोटींचा दावा  title=

मुंबई: सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना सावधान करणारी एक बातमी आहे. बॉलिवडूचा शहेनशाह अमिताभ बच्चन सध्या वादात सापडले आहेत. बिग बींना फेसबूकवर कविता टाकणं महागात पडण्याची शक्यता आहे. 

बच्चन यांच्या फॉलोअरनं एक कविता पोस्ट केली. अमिताभ यांनी हीच कविता आपल्या ऑफिशियल पेजवर शेअर केली. या कवितेला तब्बल २० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्सनी लाईक केली. 

ही कविता हरियाणातले लोककलाकार डॉ. जगबीर राठी यांनी आपली असल्याचा दावा केलाय. तसंच यासंदर्भात गेल्या महिनाभरापासून अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र बच्चन यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं त्यांनी अखेर कायदेशीर मार्ग अवलंबला. राठी यांनी थेट बच्चन यांना एक कोटी रुपयांच्या भरपाईची नोटीस पाठवलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.