दीवार चित्रपटातील लूकचं रहस्य उलगडलं

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलचे शेकडो फॅन्स आहेत. मात्र त्यांच्या अॅंग्री यंग मॅन लूकची गोष्ट वेगळीच आहे.  १९७६ ला रिलीज झालेली दीवार फिल्मला लोकांनी खूप पसंती दिली, त्यात खासकरुन बीग बींच्या लूकला लोकांनी जास्त पसंत केलेय. 

Updated: Jul 3, 2014, 06:40 PM IST
दीवार चित्रपटातील लूकचं रहस्य उलगडलं title=
फाईल फोटो

मुंबई : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या स्टाईलचे शेकडो फॅन्स आहेत. मात्र त्यांच्या अॅंग्री यंग मॅन लूकची गोष्ट वेगळीच आहे.  १९७६ ला रिलीज झालेली दीवार फिल्मला लोकांनी खूप पसंती दिली, त्यात खासकरुन बीग बींच्या लूकला लोकांनी जास्त पसंत केलेय. 

बुधवारी रात्री बीग बी यांचा सिनेमा दीवार मधल्या आपल्या लूकच्या मागे लपलेलं सत्य ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना सांगितलं.

बिग बी यांनी ट्विटरवर दिवारमध्ये त्यांच्या डाव्या खांद्यावर दाखवलेली दोरखंड आणि लांब शर्ट मागचं खरे सत्य सांगितलंय.

 

T 1533 - The knotted shirt and rope on shoulder in 'Deewar' was an adjustment for an error in stiching .. shirt too long so knotted it .. !!

— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 2, 2014

खरंतर त्यांच्या त्या स्टाईलला सगळ्यांनी फॅशन समझली पण तर ती त्यांची मजबूरी होती. शर्ट लांब असल्याने बीग बींनी त्या शर्टला गाठ बांधली आणि मग ती स्टाइल बनली. 

तसंच डाव्या खादयावर बांधलेल दोरखंड हा देखील स्टाईलचा भाग नव्हता तर, शर्टची चुकीची शिलाई लपवण्यासाठी हा आधार घ्यावा लागला होता. 

जे काही कारण असो पण प्रेषकांनी त्यांच्या फेवरेट स्टारला खूप पसंत केले होते. यश चोप्राने दिग्दर्शित केलेल्या दीवार चित्रपटापासून अॅंग्री यंग मॅन लूकची सुरुवात झाली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.