'मुली घराच्या आत्मा असतात' - महानायक अमिताभ

बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी यांनी मुली घराच्या आत्मा असतात असं म्हटलं आहे. "मुली या खास असतात आणि त्या कुटुंबाला एकत्र जोडतात" असं त्यांनी आपल्या ऑफिशीयल ब्लॉगवर म्हटलं आहे.

Updated: Nov 13, 2014, 03:57 PM IST
'मुली घराच्या आत्मा असतात' - महानायक अमिताभ title=

मुंबई : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ऑफिशीयल ब्लॉगवर मुली घराच्या आत्मा असतात, मुली या खास असतात आणि त्या कुटुंबाला एकत्र जोडतात" असं म्हटलंय.

'मुली या खास असतात, अगदी खास असतात. त्या घराचा आत्मा बनून जातात. आपल्या सर्वांना जी मायेची ऊब मिळते ती त्यांच्यामुळेच असते', असं अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटलंय. 

महानायक अमिताभ आणखी मुलींविषयी बोलतांना म्हणतात, 'त्या संयोजन करतात, प्रभुत्व गाजवतात, मुली सुरक्षित करतात, विश्लेषण करतात, अधिकार, सत्ता गाजवतात, चालवतात आणि हा नाजूक धागा पसरवून त्या संपूर्ण परिवाराला एकत्र बांधून ठेवतात. मुली म्हणजे कारण. मुली म्हणजे सल्लामसलत. मुली म्हणजे मार्गदर्शन. त्या सर्वेसर्वा असतात.'

महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात मुलीची भूमिका करणाऱ्या दीपिका पदुकोनसोबतचे छायाचित्रही शेअर केलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.