अभिनेता सुशांत सिंह राजपूतला गर्लफ्रेंडन लगावली 'श्रीमुखात'!

टीव्ही सीरिअल्समधून बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करणारा सुशांत सिंह राजपूतला त्याची गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर अंकिता लोखंडेनं कानखाली मारली आहे. 

Updated: Apr 28, 2015, 11:59 AM IST
अभिनेता सुशांत सिंह राजपूतला गर्लफ्रेंडन लगावली 'श्रीमुखात'! title=

मुंबई: टीव्ही सीरिअल्समधून बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करणारा सुशांत सिंह राजपूतला त्याची गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर अंकिता लोखंडेनं कानखाली मारली आहे. 

झालं असं की, २२ एप्रिलला रात्री सुशांत आणि अंकिता मुंबईच्या एका डिस्कोमध्ये पार्टी करण्यासाठी गेले होते. पार्टीत सुशांतनं जास्त प्रमाणात मद्यपान केलं होतं. त्यांनतर सुशांत त्याच्या मैत्रिनींसोबत डान्स करत होता. ही गोष्ट अंकिताला आवडली नाही. तिनं सुशांतला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही उपयोग न झाल्यानं अंकिताने सर्वांसमोर सुशांतच्या कानाखाली लगावली. 

यापूर्वी अंकितानं यशराज स्टुडिओमध्ये सुशांतच्या कानाखाली लगावून वाद निर्माण केला होता. सुशांत आणि अंकिता गेल्या पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या होत्या. अंकिता लोखंडे झी टीव्हीचा लोकप्रिय कार्यक्रम 'पवित्र रिश्ता'मध्ये मुख्य भूमिकेत होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.