आमच्या लग्नाची अफवाच - अनुष्का शर्मा

Last Updated: Sunday, August 24, 2014 - 00:00
आमच्या लग्नाची अफवाच - अनुष्का शर्मा

नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न झाले ही अफवा आहे, असे स्पष्टीकरण अभिनेत्री अनुष्काने दिले आहे. आमचा लग्नाचा विचार नाही, असेही तिने सांगितले.

आघाडीचा खेळाडू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेम कहाणीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच त्यांनी लंडनमध्ये गुपचुप लग्न केलं अशी चर्चा होती. याबाबत अनुष्का म्हणाली, लग्न केले ही अफवा आहे. तातडीने आपला विराटशी लग्न करण्याची योजना नसल्याचे तिने यावेळी स्पष्ट केले.

अनुष्का इंग्लड दौऱ्यावर विराट सोबत आहे. तर याआधी न्यूझीलंड दौऱ्यावेळी अनुष्का विराटला भेटण्यासाठी ऑकलंडला गेली होती. तिथल्या रस्त्यावर हातात हात घालून फिरतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला होता. 

विराटला अनुष्का एका शॅम्पू जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान भेटली. त्यानंतर विराट आणि अनुष्का यांच्यातील प्रेम फुलत गेलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 23, 2014 - 23:41
comments powered by Disqus