अर्जुन रामपालला बायकोनं काढलं घराबाहेर?

Updated: Dec 18, 2014, 06:02 PM IST
अर्जुन रामपालला बायकोनं काढलं घराबाहेर? title=

 

मुंबई: अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहेर यांच्यात वाद असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता तर अर्जुनला त्याच्या बायकोनं घराबाहेर काढलं असून तो सध्या हॉटेलमध्ये राहतोय.
मिस्टर अँड मिसेस रामपाल जरी सांगत असतील की, त्यांच्यामध्ये सगळं काही सुरळीत चालू आहे. पण त्यांच्यात काहीतरी बिनसलंय ते ही सुझान खानमुळे... सुत्रांच्या माहितीनुसार हल्लीच मिस्टर रामपाल आणि सुझान एकत्र एका रोमँटिक व्हॅकेशनवर जाऊन आले आहेत.

बायकोसोबत झालेल्या वादामुळं अर्जुन रामपाल सध्या हॉटेलमध्ये राहत आहे. सुत्रांक़डून अशी देखील माहिती मिळाली आहे की हृतिक आणि सुझानच्या घटस्फोटानंतर मिस्टर अँड मिसेस रामपालचा देखील घटस्फोट होण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.